कपाशी पिकामध्ये आकस्मिक मर व्यवस्थापन कसे करावे. by RFIS-ADVISORIES published on 2022-09-29T16:12:39Z रिलायन्स फाऊंडेशन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,कृषी विषयक सल्ला याप्रमाणे कपाशी पिकामध्ये आकस्मिक मर व्यवस्थापन:अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.लवकरात लवकर २०० ग्रॉम युरिया अधिक १०० ग्रॉम पालाश (पोटॅश) अधिक २५ ग्रॉम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मि.ली. याप्रमाणे आळवणी करावी. किंवा पर्यायी व्यवस्थापणामध्ये १ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॉम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॉम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मि.ली. आळवणी करावी. आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.धन्यवाद!